जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगारांच्या अस्मितेसाठी लढा दिला : शरद पवार

Pawar-George

नवी दिल्ली : देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शोक व्यक्त केला. देशातील कामगार चळवळीला बळ आणि नवी दिशा देणारे लढवय्ये नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले याचे मला मोठे दुःख झाले आहे. कामगारांच्या अस्मितेसाठी लढा देणारा नेता आपण गमावला, अशा शब्दांत पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

जॉर्ज फर्नांडिस हे १९४९ मध्ये मुंबईला आले होते . मुंबईत कामगारांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि शेवटपर्यंत लढा दिला . कामगारांना न्याय मिळून दिले. त्यांनी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांची सशक्त संघटना उभारली. रेल्वे कामगार संघटनांची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती . जॉर्ज फर्नांडिस यांनी देशात अनेक पदे भूषवली .

ही बातमी पण वाचा :फर्नांडिस यांच्यासारखा बेडर आणि लढवय्या नेता अजून पाहिला नाही : संजय राऊत

ते एक उत्तम संसदपटू होते तसेच त्यांनी देशाच्या उद्योगमंत्री आणि संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना एक प्रभावी प्रशासक म्हणून स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण केले . विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते . ते माझे चांगले मित्र होते.  त्यामुळे त्यांच्या निधनाने मी एका चांगल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला मुकलो आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन