मुंबईत तीन आठवड्यांत सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचा आमच्याकडे रोडमॅप; आदित्य ठाकरेंची माहिती

Aaditya Thackeray

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर अन्य राज्यांप्रमाणे आम्हीदेखील लसीसाठी संघर्ष करत आहोत. आम्ही मुंबईसाठी जागतिक स्तरावर लसीची खरेदी करण्याची शक्यता पडताळून पाहात आहोत. जर आम्ही असं केलं तर मुंबईच्या नागरिकांचं तीन आठवड्यांच्या आत लसीकरण करण्याचा रोडमॅप आमच्याकडे आहे, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केले. लसीकरणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. कारण लस आल्यानंतर ज्या चिंता होत्या त्या आता पहिल्यापेक्षा कमी झाल्या आहेत. आता लोकांना लसीचे दोन्ही डोस हवे आहेत आणि मला वाटतं हे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत सर्व भारतीयांचे लसीकरण होत नाही तोवर सर्व भारतीय सुरक्षित नसल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला ; अतुल भातखळकरांची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button