दुःख वाटून घेणे ही आपली संस्कृती’, रोहित पवारांचे पंतप्रधान मोदींना भावनिक आवाहन

Rohit Pawar-PM Modi

अहमदनगर : परतीच्या पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिके पूर्णपणे वाहून गेले आहे. त्यामुळं राज्य सरकारपुढं आणखी एक संकट उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा जीएसटीच्या
(GST)वाट्याची मागणी केली आहे. ‘दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे…’ असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला आहे.

संकट मोठं असल्यानं केंद्र सरकारनं मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केली आहे. तर, केंद्र सरकारची मदत मिळवण्यासाठी काही निकष आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी वेळ जाणार आहे, असं राज्यातील भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या वाट्याच्या जीएसटी परताव्याचा मुद्दा समोर केला आहे.

एक ट्वीट करून त्यांनी केंद्र सरकारकडे जीएसटीच्या रकमेची मागणी केली आहे. ‘आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे… तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेत आहेच, पण केंद्रानेही #GST चे राज्याचे थकीत २८ हजार कोटी ₹ तातडीने द्यावेत. अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी,’ असं रोहित यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : मदत सोडून फडणवीसांवर कुत्सित टिप्पणी करणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार – दरेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER