कोरोनाच्या उपाययोजनेत यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो, धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती

Dhananjay Munde

बीड :- दिवसेंदिवस महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. लॉकडाऊन शिवाय आता आता दुसरा पर्याय उरलेला नाही. कोरोना (Corona) काळात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो. प्रशासन म्हणून आपण काळजी घेतली नाही. जनतेने तर काळजी घेतलीच नाही तर परिस्थिती गंभीर होईल याचा अंदाज मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला होता. ९ जणांचा अंत्यविधी एकाच सरणावर झाला. उद्या २५ जणांचा एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ येईल. त्यामुळे लॉकडाऊन हे केलंच पाहिजे, असं मत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलं. मुंडे यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आता मागचे सर्व झटकून कामाला लागा, असं पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अधिकाऱ्यांना म्हणाले. जिल्ह्यात ऑक्सिजनचे २,५०० बेड तयार केले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आणखी नव्याने एक हजार ऑक्सिजनचे बेड तयार करणार आहोत. बेड कमी पडले तर खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, अशा सूचना मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button