‘भेटीची माहिती सार्वजनिक करायची नसते’, पवारांच्या भेटीवर अमित शहांचे सूचक विधान

Amit Shaha - Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई : मनसुख हिरेन मृत्युप्रकरण, अँटिलिया स्फोटके  प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आणि अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), वरिष्ठ नेते प्रफुल्ल  पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab mailk) यांनी  भेटीचे वृत्त फेटाळले आहे.

मात्र असले तरी या कथित भेटीबाबत खुद्द अमित शहा (Amit Shah) यांनी सूचक विधान केले आहे. आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहा यांनी सूचक विधान केले. शरद पवार यांनी शहा यांची  भेट घेतल्याची माहिती पुढे येत आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती यावर प्रश्न विचारला असता, कुठल्याही भेटीचं वृत्त अथवा माहिती सार्वजनिक करायच्या नसतात, असे म्हणत शहांनी अधिकच सस्पेन्स वाढवला आहे. दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल्ल  पटेल यांची अमित शहा यांच्यासोबत गुप्त भेट झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे.

शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button