एवढी लाचार शिवसेना बघितली नाही : सावरकरावरून फडणवीसांची टीका

Savarkar - Devendra Fadnavis

मुंबई : आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरच नाही, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याहीकरीता भारत रत्न देण्याची मागणी केली आहे. मग त्यांना भारत रत्न मिळेपर्यंत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा गौरव करणार नाही का? काही तरी लाज राहू द्या, असा सवाल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : मुख्यमंत्री

सावरकरांचा गौरव करायला शिवसेनेला लाज वाटते का? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. आजच्या एवढी लाचार शिवसेना आम्ही बघितली नसल्याचे फडणवीस म्हणाले. काँग्रेस नेते मणिशंकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अय्यर यांच्या पोस्टरला जोड्याने मारले होते. इथे मात्र काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांना बलात्कारी ठरवले जाते. मात्र शिवसेना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसते. मात्र त्या मुखपत्रावर बंदी घालण्याची मागणी करायला तयार नाही.

सावरकरांबद्दल केवळ गौरवाचे दोन शब्द त्यांच्याबद्दलचा प्रस्ताव आणा आम्ही मान्यता देऊ, असे आम्ही म्हटले. काय आम्ही राजकारण केले. तेही जर मानायला तयार नाही तर त्यांचे सावरकरांबद्दलचे त्यांचे बेगडी प्रेम आहे. आम्ही हे सहन करणार नाही. केंद्राने भारत रत्न द्यावा त्यानंतर आम्ही अभिनंदन प्रस्ताव आणावा त्यानंतर आम्ही प्रस्ताव आणू, असे सत्ताधारी पक्षाने म्हटले आहे? या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले याची तर त्यांना लाजच वाटली पाहिजे.