सत्तेत आलो तर उभारू परशुरामाचा पुतळा – मायावती

- असेल सपाच्या पुतळ्यापेक्षा मोठा

Mayawati

लखनऊ : उत्तर प्रदेशात (UP Govt) आमचे सरकार आले तर भगवान परशुरामाचा (Parashurama) सर्वात उंच पुतळा उभारू, अशी घोषणा बसपाच्या मायावती (Mayawati) यांनी केली. या आधी मुलायम सिंग यांच्या सपानेही परशुरामाचा १०८ फूट उंच पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे.मायावती म्हणाल्या की आम्ही उभारलेला परशुरामाचा पुतळा सपाच्या पुतळ्यापेक्षा उंच असेल.

सपावर टीका करताना मायावती म्हणाल्या की, परशुरामाचा पुतळा उभारण्याची सपाची घोषणा निवडणुकीवर डोळा ठेऊन करण्यात आली आहे. आम्ही सत्तेत आलो तर ब्राम्हण समाजाची काळजी घेऊ. ब्राम्हण समाजाचा बसपाच्या शब्दावर अन् कृतीवर पूर्ण विश्वास आहे.

राम मंदिर बांधण्याच्या नावाखाली बरेच राजकारण सुरू आहे. हे योग्य नाही. ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दलित समाजाचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही सोबत नेले असते तर बरे झाले असते. समाजात याचा चांगला संदेश गेला असता, असे मायावती म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER