आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो – प्रकाश आंबेडकर

- पहिले सम्राट अशोक ...

Prakash Ambedkar

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे नेते उदयनराजे भोसले समोरासमोर आले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) नाव न घेता उदयनराजे बिनडोक असल्याची टीका केल्यानंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका सुरू केली. त्याच्या उत्तरात प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही तीनच राजे मानतो – राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज.

वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाही. ही भूमिका वैचारिक आहे आणि ती कायम राहील, असे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली होती. ‘एक राजा तर बिनडोक आहे. असे मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत.’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असे उदयनराजे भोसले म्हणतात. भाजपाने यांना राज्यसभेवर कसे पाठवले तेच कळत नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केले होते. यानंतर आंबेडकर आणि उदयनराजे यांच्या समर्थकांत वाद सुरू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER