कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठीशी – संजय राऊत

Sanjay Raut-Raj Thackeray

मुंबई : कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात समन्स बजावल्यानंतर आज राज ठाकरे ईडी कार्यालयात हजर झाले असून त्यांची चौकशी सुरु झाली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत. संकटकाळी आम्ही एकत्र उभे असतो. हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. राजकारणात कितीही विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी जात असतांना आईचे डोळे पाणावले हात धरुन…

ही सत्यनारायणाची असो की श्रावणाची पूजा नसती उठाठेव नको, संकटसमयी कुटुंबसोबत असणं साहजिक आहे, असे म्हणत त्यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटला सडेतोड उत्तरही दिले आहे.

याआधी काल उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. ‘मला नाही वाटत की या चौकशीतून काहीही बाहेर पडणार नाही.’ असे म्हणत त्यांनी राजची पाठराखण केली होती.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे संकाटाच्या काळात नेहमी एकमेकांसोबत उभे राहतांना याआधी देखील दिसले आहेत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसताना राज ठाकरे हे थेट रुग्णालयात गेले होते आणि स्वत: गाडी चालवत त्यांना मातोश्रीवर घेऊन आले होते. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रसंगी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंना पत्र … अन्यथा मनसैनिकांनाही म्हणावं लागेल, ‘अनाकलनीय’!