वसुंधरेचे आम्ही विश्वस्त (भाग ३)

Planet

वसुंधरेचे ऋण फेडू म्हटले तरी फिटणारे नाहीच , तरीही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी या वसुंध रेने , त्यावरील पर्यावरणा ने किंवा जैवविविधतेने आम्हाला जे काही दिले त्या प्रती आम्ही निश्चितपणे काहीतरी देणे लागतो. या आश्वस्त अशा निसर्गाचे कायम आमच्यावर दोन्ही हातांनी केलेली उधळण, ते करणारे हातच आता आम्हाला व्हावे लागेल. खरं म्हटलं तर ही परतफेड ही काही अंशी आमचा स्वार्थच आहे की ! आजच्या पिढीला मिळणारे, निदान थोडे प्रदूषणविरहित वातावरण पुढच्या पिढ्यांना ही तसेच मिळत राहावे हा स्वार्थ आहे आमचा त्यामध्ये !

परंतु या वसुंधरेवरील विविध जिव जीवाणूंचा, वृक्ष वेलींचा, किड्यांचा अभ्यास करणारे अनेक लोक आज सदैव कुठल्यातरी मार्गाने भेटत राहतात. त्यांची तन्मयता ,त्यांचा अभ्यास ,त्यांचे ध्येय हे सगळे बघून अक्षरशः आपल्या चाकोरीबद्ध आयुष्याची लाज वाटायला लागते. सगळ्यांना असे करणे शक्य नाही .तरीही निदान मी ,माझे आणि माझ्या आजूबाजूच्या परिसरातले प्रदूषण ,दूर करून पर्यावरणाला मदत करण्याचा प्रयत्न तर करायला पाहिजे अशी एक प्रेरणाही यातून आपल्याला मिळते.

आणि या पर्यावरणाच्या लढ्यात देखील स्त्रियांच्या शक्ती सामर्थ्याने दिपून जायला होते. या लढ्यामध्ये सर्वत्र स्त्रिया अग्रभागी असल्याचे दिसते. अशीच एक कर्नाटकातल्या सालू मरदा थिमक्का यांना 2019 चा पद्मश्री पुरस्कार मिळाला. या बाईंनी आपल्या आयुष्यात आपल्या परिसरात जवळजवळ 400 झाडे लावली. विशेष म्हणजे ही सर्व झाडे वडाची आहेत, वड ,पिंपळ आणि औदुंबर या झाडांना प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आणि लोक जीवनामध्ये खास स्थान आहे. त्या झाडे लावून थांबल्या नाहीत, तर त्यांनी ती जोपासली ,आणि आता झाडांचीही रंग कर्नाटक राज्यातील बेंगरूळ जवळील हुळीकल ते कुडुर या राज्य मार्गावरील चार किलोमीटरच्या पट्ट्यांमध्ये उभी आहे .गरीबीमुळे लहानपणापासूनच त्या मजुरी करायचा.

मजुरी करणार्या ची- -क्कय्या बरोबर त्यांचे लग्न झाले. पण पोटी संतान नव्हते त्यामुळे त्या कष्टी व्हायच्या. त्यावर विरंगुळा म्हणून त्यांनी ही रोपे बनवायला सुरुवात केली .त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखून त्यांना पुढे इंदिरा प्रिय दर्शीनी सन्मानही मिळाला .शंभरीच्या असूनही तब्येतीच्या तक्रारी असल्या तरी त्यांचे पर्यावरण संवर्धनाचे काम सुरूच आहे. पावसाचे पाणी साठवून हौद बांधण्याच्या स्थानिक कामांमध्येही त्यांचा सहभाग आहे. तशाच हिमाचल प्रदेशातील किंकरी मध्ये दलित समाजात जन्मलेल्या. लहानपणापासूनच नोकर म्हणून कामाला लागल्या चौदाव्या वर्षी बांधकाम मजूर शी लग्न झाले. काही वर्षातच नवरा आजारी पडून मरण पावला .त्यासुमारास हिमाचल प्रदेशातील मोठ्याप्रमाणात खाणी खोडल्य जात होत्या .त्यामुळे पाण्याचे साठे नष्ट होत होते .तेव्हाच भातशेती नष्ट होऊ लागली .

सामान्य जनजीवनावर अनिष्ट परिणाम होऊ लागला .मजुरी करणाऱ्या या स्त्रीने बेकायदा खानकाम करणाऱ्या आणि खाणीतून उत्पन्न काढणाऱ्या बलाढ्य अखंड माफियांविरुद्ध लढा उभारला हे अगदी विशेष होते. तिच्यामागे एक स्थानिक स्वयंसेवी संस्था ही उभी होती त्यांनी जनहितार्थ खटला दाखल केला. खटल्याची सुनावणी झाली आणि खाणंमालकांनी कींकरा देवी विरुद्ध उलट कांगावा सुरू केला त्यामुळे तिला अन्यायाच्या दारात आमरण उपोषणाला बसावे लागले .आता न्यायालयाला दखल घेणे भाग पडले .त्यांनी हिमालयातील खाण कामावर स्थगिती आणली .निसर्गाच्या मांडीवर वाढलेल्या किकंरीदेवीने आपले ऋण असे फेडले. पण सर्वसामान्यांच्या जगण्यावर आलेले संकट निवारण केले.

राजस्थानच्या रुक्ष वाळवंटी प्रदेशातील लोकांचा जीवन आधार असलेला खेजडी वृक्ष हा स्थानिकांच्या गरजा भागविणाऱ्या एक कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. राजाच्या नव्या महाला साठी लाकूड हवे म्हणून खेजरी ची झाडे तोडायला आलेल्या सैनिकांचा प्रतिकार केला तो अमृतादेवी आणि तिच्या तीन मुलींनी. सत्तेचा माज असलेल्या सैनिकांनी, झाडाला मिठी मारलेल्या अमृतादेवी आणि तिच्या मुली वर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्यांनी झाडासाठी आत्मबलिदान केले मग गावकरीही धावून आले. तीनशेहून जास्त लोकांचे बलिदान झाडांसाठी पडले तेव्हा राजा भानावर आला.

स्त्रियांचे असे निसर्गाशी नाते घट्ट असते कारण या आणि लाकूड, जळण, औषध ,निवारा सगळ्यासाठी त्या परिसरातील निसर्गसृष्टी वरच अवलंबून असतात. हिमालयाच्या पर्वत उतारांवर चे जंगल स्थानिकांच्या गरजा भागवणारे ब्रिटिश राज्य जरी गेले तरी त्यांचे अन्याय धोरण स्वातंत्रोत्तर काळात चालू राहिले जमला वरच्या स्थानिकांच्या हक्कांपासून त्यांना वंचित केले गेले. म्हणूनच १९६४ मध्ये चंडिप्रसाद भट्ट यांनी चमोली जिल्ह्यात एक संस्था स्थापन केली त्याचा उद्देश होतात बेसुमार होणारी वृक्षतोड आणि त्यामुळे होणारे वाळवंटीकरण पाणी चारा लाकूड फाट्याचा अभाव थोपवणे. गांधीजींच्या अहिंसक मार्गाने ही चळवळ लढा देत मध्ये वनखात्याच्या अनिष्ट धोरणाविरुद्ध लोक संघटित झाले.

तरीही सरकारी धोरणात बदल झाला नाही .१९७० मध्ये अलकनंदा नदीला आलेल्या पुराने वृक्षतोडीचे दुष्परिणाम ठळकपणे लोकांनी अनुभवले, विकासाच्या उद्देशाने केलेले बांधकाम हे डोंगर, जमीन खचणे असे विनाशक ठरले . वनखात्याच्या अनिष्ट धोरणाविरुद्ध लोक संघटित झाले आणि जंगल तोडीला विरोध झाला पण पण सरकारी धोरणात बदल झाला नाही . हैदराबादच्या व्यापारी कंपनीला क्रीडा साहित्य बनविणाऱ्या 300 झाडे तोडायची परवानगी मिळाली. तेव्हा ग्रामसभेत ठराव करून लोकांनी ढोल-ताशांच्या आणि घोषणांच्या दणदणातात ठेकेदारांना माघारी पाठवले ठिकाणी झाडांना मिठी मारून झाडे वाचविण्याचा दृढ संकल्प दाखविला. हेच ते चिपको आंदोलन ! सर सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अहिंसक मार्गाने केलेल्या चिपको आंदोलनाने नवा इतिहास लिहिला.

जंगला विषयी असणारे आकर्षण, जैवविविधतेचा अभ्यास याबाबतीतही अनेक लोक संशोधन करत आहेत. किंबहुना त्याच्या मध्ये पूर्णपणे स्वतःला समर्पित केलेले आहे. जंगलाचे शेतकरी मानल्या जाणाऱ्या हॉर्न बिल्स म्हणजेच आपण म्हणतो ,त्या धनेश पक्षाच्या संरक्षण संवर्धनासाठी थायलंडच्या एका विद्यापीठातल्या सूक्ष्म जीवशास्त्राच्या प्राध्यापक पिलाई पूनस्वाद गेली दोन दशकं थायलंड मधल्या जंगलात अथक प्रयत्न करत आहेत त्यांनी चोरट्या शिकाऱ्यांना हेरलं आणि धन्याचा खाद्य असणारी झाडं आणि जंगलं कसे वाचवता येतील यावर काम सुरू केलं इतकच नाही तर त्यांच्यासाठी घरटे दत्तक योजना सुरू केली.

आशियाई देशाच्या संस्कृतीमध्ये हत्तीला फार महत्त्व आहे. असं जरी असलं तरी हस्ती जनता साठी चोरटी शिकार सतत होतच असते प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे मानव आणि वन्य प्राणी संघर्ष शिगेला पोहोचतो आहे. याच पार्श्वभूमीवर सिंथीया मोस ने ओरिया आणि इयान त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ,किलीमांजारो पर्वताच्या पायथ्याशी अंबोसेली तिथे 14 वर्ष राहून आफ्रिकन हत्तींवर मूलभूत संशोधन केलं. हत्तीची हुशारी बुद्धिमान उत्कट आणि मजेशीर प्राणी म्हणून असलेलं वैशिष्ट्य त्याच परिसराच ज्ञान एकमेकांशी दूरवरून संपर्क साधू शकणे या गोष्टी जगाला कळाव्यात म्हणून त्यांच्या सगळ्या भावभावनांचे अनुभव एलिफंट मेमरीज या ग्रंथात शब्द बद्ध केले .

वैश्विक वातावरणात बदल आता आपल्या दरवाजावर धडका मारत आहे. म्हणूनच पर्यावरण शिक्षण आणि जाणीवजागृती कडे वेगळ्या पद्धतीने आणि गंभीरपणे बघायची वेळ आली आहे .भारतात पर्यावरण शिक्षण शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग फार सुरूवातीपासून जरी असला तरी तो विद्यार्थ्यांना विचारप्रवण करण्यासाठी पुरेसा नाही. विविध विकास कार्यक्रमांचा हा एक भाग केलेला असूनही दीर्घकालीन कृतिकार्यक्रम होत नाहीत हे लक्षात घेऊन कविता गुप्ता कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅली मधल्या इथं सरकारी शाळा शाळेत दोन दशकं पर्यावरण शिक्षणासाठी काम करत आहे. दररोजच्या जीवनात त्याचा काय उपयोग होईल आणि भवताल बदलत असताना कशी निरीक्षण केली पाहिजेत हे समजण्यासाठी महत्त्वाचा असा शिक्षणक्रम तिने शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या अनुमतीने ठरवला .गला पोगोसबेटावर जाऊन मुलांना जीवशास्त्र उत्क्रांती या विषयांमध्ये अधिक रस कसा निर्माण होईल आणि आज तिथं किंवा तशाच इतर ठिकाणी जाऊन विद्यार्थी कसे शिकतील यावर संशोधन करत आहेत .

ब्राझील चीन मेक्सिको बरोबरच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही बराच वरचा क्रमांक लागतो याचा विशेष अभ्यास केला. एकीकडे ग्रेटा थनबर्ग आणि तिच्या सारखी तरुण मुलं-मुली वातावरण बदलासाठी जनमत तयार करण्याचं, शासन संस्थांवर? दबाव आणण्याचे काम करताना दिसतात तर शिक्षिका शिक्षण क्षेत्रातील बदलामधून वातावरण बदलाच्या परिणामांना तोंड देत प्रत्यक्ष कृती करण्यासाठी तयार करताना दिसतात.

घनकचरा व्यवस्थापन किंवा पुनर्चक्रीकरण यामध्ये अनेक लाख भारतीय नागरिक काम करत आहेत. परंतु घनकचरा निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की या या बाबत आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणणे हे आता भारतासमोर असे आव्हान आहे .ब्राझील चीन मेक्सिको बरोबरच मोठ्या प्रमाणात करताना निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही वरचा क्रमांक लागतो त्यापैकी काही हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली पण जाते पण उरलेला कचरा ! त्याचे काय ? आपल्या खिडकीच्या समोर कोणी कचराकुंडी ठेवलेली आपल्याला आवडेल का? अजिबात नाही हा उरलेला कचरा टाकण्यासाठी जी एवढी मोठी जमीन लागते, ती लवकर उपलब्ध होत नाही कारण गावकरी हे सहन करत नाहीत. मग अशा कचऱ्याचं करायचं काय ?

फ्रेंड्स ! इच्छा तेथे मार्ग. कचऱ्याच्या योग्य वापरातून बेरोजगारी कमी करू शकता ,गुन्हेगारी पावलं थांबवू शकता, सौंदर्य अलंकार बनवू शकता ,शाळा गळती थांबवू शकता असं म्हटलं तर विश्वास बसायचा नाही. पर्यावरणाचे बकालपण वाढवणारा हा घटक पण यातून उद्योगांच्या नव्या वाटा खुल्या झाल्या. रोजगार निर्मिती झाली आणि कचर्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थेट 360 अंशाच्या डिग्री ने बदलायला लावला . अमेरिका युरोप येथील देशांमधून कार्पोरेट संस्कृती आकाराला येत असताना टनावारी टाकाऊ कागदांचा कचरा निर्माण व्हायचा यातली संधी चीन मधील झांग इन हिने पकडली आणि तो कचरा जहाजाने थेट चीनमध्ये आणून प्रक्रिया करून कार्डबोर्ड सारख्या कॉप्या साठी लागणाऱ्या पुठ्ठ्याची निर्मिती करणे सुरू केले णि पुढे हा उठाव चीनमधून मोठ्या प्रमाणात पाश्‍चिमात्य राष्ट्रांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खेळणी फर्निचर यासारख्या ग्राहकोपयोगी वस्तू साठी वापरला जायचा. यातून तिची “नाईन ड्रॅगन पेपर”ही कंपनी हॉंगकॉंग शहरा बाहेर तर एक अमेरिकेच्या लॉस एंजेलिस मध्ये तिला चीनची कचरा क्वीन अशी उद्योग जगात उपाधी आहे. अतिशय हलाखीच्या भूतकाळातील या मुलीने पुढे संधी बघून लॉस एंजेल्स ला आपले स्थलांतर केले.

असाच प्रयत्न पोस्टची निर्मिती करून बेरोजगारी थोपवणारी केनिया मधील Lorna tutti .प्लास्टिक वर प्रक्रिया करून कोट्यावधीचा उद्योग उभारून सामाजिक बदलाची प्रवर्तक ठरलेली आफ्रिकेच्या गांबिया तील इसाटाऊ सेसे अशा अनेकांनी यावर काम केले. असे अनेक लोक जगभरातून या प्रश्नावर काम करत आहेत .(जागेअभावी सगळ्यांचा परिचय शक्य नाही .स्त्री संशोधकांचे दाखले दिल्या गेले आहेत .याचा अर्थ स्त्री संशोधक यावर काम करतात असे नाही, परंतु तात्काळ मला जे संदर्भ सापडले त्यांचा उल्लेख केला गेला एवढेच. मुळातून हे सांगण्यामागे केवळ आपल्याला नवीन दिशा आणि प्रेरणा मिळाव्यात एवढाच उद्देश आहे .)आणि आणि मुख्य म्हणजे स्थानिक पातळीवर देखील शहरांमधून अनेक पर्यावरणावर काम करणारे ग्रुप संस्था खूप जोमाने काम करतात आहे.

फ्रेंड्स ! आपल्यापैकी कोणी किंवा आपल्या परिसरातील कोणी ,अशी काही कार्य करत असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. तुम्ही दिलेले संदर्भ सगळ्यातपर्यंत पोहोचवले तर मला आवडतील .ह्या बाबत केवळ लेख लिहावा एवढा उद्देश नाही ,तर त्याबाबत जागृती होऊन काहीतरी सॉलिड असे कार्य तयार व्हावे अशी इच्छा आहे. तुमच्या कमेंटची वाट पाहते. ( “वेध भवतालचा ” हे अर्चना जगदीश यांचे सदर)

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER