आम्हाला तुमचा अभिमान आहे, क्रिकेट खेळाडू लक्ष्मणने केले पोलिसांचे कौतुक

- रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करण्यासाठी दोन किलोमीटर धावला होता

VVS Lxman

हैदराबाद : एका वाहतूक पोलिसाने वाहनांच्या गर्दीत धावून रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून दिला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. व्हीडिओ पाहून भारताचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’ असे ट्विट करून त्याचे कोतुक केले.

सोमवारी हैदराबाद येथील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकून पडली. आबिद यातायात पोलीस ठाण्याचे हवालदार बाबजी यांनी या रुग्णवाहिकेच्या पुढे धावत तिला रस्ता मोकळा करून दिला.यासाठी ते सुमारे दोन किलोमीटर धावले.

रुग्णवाहिकेत बसलेल्या एका व्यक्तीनेच हा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. हा व्हिडियो पाहिल्यानंतर अनेकांनी हवालदार बाबजीवर कौतुकाचा वर्षाव केला. भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने हैदराबाद पोलिसांना टॅग करत म्हटले की, “हे खूप छान आहे. रुग्णाला घेऊन चाललेल्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी वाहतूक हवालदार दोन किलोमीटर पर्यंत पळत होता. आम्हाला तुमचा अभिमान आहे.”

तेलंगणाचे अर्थ मंत्री टी. हरीश राव तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे कौतुक केले होते. गुरुवारी स्मृतीचिन्ह देऊन बाबजी यांना गौरविण्यात आले.

या कामातून आनंद मिळाला

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हवालदार बाबजी म्हणाले की, “वाहतूक कोंडी झाल्यामुळे रुग्णवाहिका अडकून पडली होती. मी फार काही विचार न करता रुग्णवाहिकेपुढे धावत सुटलो. रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीतून बाहेर काढून दिल्यानंतर मला समाधान आणि आनंद मिळाला. हे माझ कर्तव्य होते आणि मी पुढेही असेच काम करत राहणार.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER