आम्ही कबड्डी-सूरपारंब्या खेळणारी माणसं; ईडीसोबत आम्ही नाही खेळत : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : ईडीने २५ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. यानंतर ईडीने विहंग सरनाईकची चौकशी करून त्यांना सोडले होते. यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे अनेक समन्स बजावण्यात आले. मात्र, तरीही ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत.

या प्रकरणी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली .आम्ही कबड्डी-सूरपारंब्या खेळणारी माणसं, ईडीसोबत आम्ही नाही खेळत. मध्यमवर्गीय माणसं आहोत, असं चपखल उत्तर दिलं आहे. तर, डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य पाळणार का? असा सवाल केला असता, आपण कधी पथ्य पाळतो का? थोडंफार राजकीय पथ्य पाळू, असं आपल्या शैलीत भाष्यदेखील संजय राऊत यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER