बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही – मनसे

Sandeep Deshpande - Uddhav Thackeray - Sanjay Rathod

मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने आयोजित कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे मनसेचे (MNS) नेते आक्रमक जाले आहेत. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम (Marathi Language Day) योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड (Sanjay Rathod) नाही, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: येऊन सही करणार आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होणार आहेत.

मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असून मनसे नेत्यांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तरीही मनसे कार्यक्रम घेण्यावर ठाम आहे. आम्ही जबाबरीने योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रम पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राज्य सरकारच्या कोरोनासंबधीच्या नियमांवर बोट ठेवले. कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारने मुंबईतील ओव्हल मैदान बंद ठेवले आहे. मात्र, मैदानावर बंदी घातल्याने कोरोना कमी होत नाही. राज्य सरकारने याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

दरम्यान पुजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर पंधरा दिवस नॉट रिचेबल राहून ते नुकतेच माध्यमासमोर आले होते. पोहरा देवी येथे त्यांनी मोठी गर्दी केली होती. कोरोना फोफावत असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी न करण्याचे किंवा कोरोनाचे सर्व नियम पाळण्याच्या सुचना केल्या असताना संजय राठोड यांनी मोठी गर्दी जमवली होती. परिणामी शिवसेनेचेच मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बीक गालत नाही अशी टीकाही विरोधकांनी केली. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला हा टोमणा मारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER