… तर आज लसींचा तुटवडा जाणवला नसता : उदयनराजे भोसले

सातारा : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . याचदरम्यान कोरोना लसींचा तुटवडाही निर्माण झाला आहे . देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप(Corona Vaccine) झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

ते गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून लादण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू उचलून धरली. मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले .

कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button