मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आम्हीही भिकारी नाही; नितीन राऊत आक्रामक

Nitin Raut

अहमदनगर :- मराठा समाजाला त्यांचे आरक्षण मिळायलाच हवे, त्याला आमचा विरोध नाही. मात्र आम्हीही हातात बांगड्या घातलेल्या नाही. आम्ही काय भिकारी आहोत का? असा प्रश्न उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या दोन मुद्द्यांवरुन नितीन राऊत यांनी कडक इशारा दिला.

काँग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते पदोन्नतीतील आरक्षणाच्या संबंधित अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, व्ही जे, एनटी यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत.

यावेळी राऊत म्हणाले, आम्हाला संविधानात्मक आणि भारतीय राज्यघटनेने जे दिले आहे, त्याचीच आम्ही मागणी करतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, त्याला आमचा विरोध नाही. मात्र त्यांनीसुद्धा मोठेपणा दाखवून आमची कोंडी करु नये. आमचं भांडवल करून तेच फक्त काम करु शकतात, आम्ही करु शकत नाही, अशी भूमिका त्यांनी घेऊ नये, अशी टीकाही नितीन राऊत यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button