आम्ही भाजपची बी टिम नाही : ॲड प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

कोल्‍हापूर :  आम्ही भाजपची बी टिम नाही. आम्हाला असे हिनवणारेच आता भाजपचे गुलाम झाले आहेत असा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला. आघाडीच्या संपादन रॅलीच्‍या सांगता आज कोल्हापुरात झाली.

विधानसभा निवडणूकीत एमआयएम साठी आमची चर्चेची दारे खुली आहेत पण त्‍यांच्‍याकडूनच ती बंद झाली आहेत असेही त्‍यांनी सांगितले. समारंभा निमीत्त ॲड. आंबेडकर कोल्‍हापूरात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आघाडीतर्फे. विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस समोर १४४ जागेवर तूम्‍ही लढा आम्‍ही १४४ जागेवर लढतो असा प्रस्‍ताव दिला होता. पण तेच बीजेपीच्‍या इशार्‍यावर चालतात. आम्‍ही वंचित आघाडीला चर्चेत अडकवून ठेवतो याबदल्‍यात आमच्‍या चौकशी थांबवा असे काँग्रेसवाले सांगत होते.. भटका विमुक्‍त समूह आजही आमच्‍या बरोबर आहे, लक्ष्‍मण माने यांच्‍या अनेक कोलांट्‍या उड्‍या मारल्या आहेत. काँग्रेस बरोबर जा हा त्‍यांचा आग्रह होता. चर्चेचे अधिकार हे माने यांनाच दिले होते. पण त्‍यात यश आले नाही. एमआयएम बरोबर चर्चेसाठीचे आमचे दरवाजे मोकळे आहेत त्‍यांनी त्‍यांचे दरवाजे बंद केले आहेत. पुढिल महिन्‍यात पहिल्‍या आठवड्‍यात वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर होणार यात मायक्रो ओबीसी यादी जाहीर होणार आहे. यानंतर मुस्‍लीम मतदार संघ, टप्‍या टप्‍याने उर्वरीत मतदार संघातील उमेद्‍वारांची यादी जाहीर करणार आहे. राज्‍यातील अन्‍य पक्षांशी नाराज व बिगनाराज दोन्‍ही आपल्‍या संपर्कात असल्याचे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले.