सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो! : लक्ष्मण माने

Udayan Raje And Shivendra Raje Bhosale

सातारा :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजे भाजपात गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत. सातारा हा आता गरिबांच्या हातात आला आहे. त्यामुळे आम्ही आता छत्रपतींचा वारसा चालवितो, अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठ्याप्रमाणात पक्षांतर झाले . त्यात राष्ट्रवादीचे दोन बडे नेते उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजे भाजपात गेले . या दोन्ही नेत्यांवर लक्ष्मण माने यांनी सडकून टीका केली आहे . दोन्ही राजे भाजपात गेले हे बरं झालं. त्यांच्या हातून साताऱ्याचा काडीचाही विकास झाला नाही. आता सातारा पालिकेत तुम्ही लक्ष घालू नका, आम्ही पालिकेत काय करायचं ते पहातो. पूवीर्सारखी राजेशाही आता राहिली नाही. त्यामुळे सर्वच राजेंच्या हातात नारळ द्यायला हवा, असा शब्दात त्यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंना खडेबोल सुनावले आहे.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांनी ज्या लुंगीला केला विरोध; तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार!