कांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती

Radhakrishna Vikhe Patil

शिर्डी : कांदा निर्यात बंदीसाठी आमचाही विरोधच मात्र, कॉंग्रेससह (Congress) विरोधकांना आपल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे. सोबतच विखे पाटील यांनी विरोधकांचा समाचारदेखील घेतला आहे.

साठेबाजीला अटकाव करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून निर्यात बंदीचे आम्हीही समर्थन करत नाही. निर्यातबंदीचा आणि नवीन कृषी धोरणाचा कोणताही संबंध नाही. मात्र काँग्रेससह विरोधक संभ्रम पसरवत असून शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

एवढेच नाही तर, विखे पाटील म्हणाले, त्या त्यावेळी सरकारला काही निर्णय घ्यावे लागतात. यापूर्वीच्या सरकारनेही असे निर्णय घेतले होते. राज्यातील भाजपा नेत्यांनीही कांदा निर्यातबंदी उठवावी, ही मागणी केलेली आहे. विरोधकांना नवीन कायद्यावर चर्चाच करायची नव्हती. आपल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल, विरोधकांना भीती असल्यानं काँग्रेससह विरोधकांना शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण करायच आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला आहे. निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकारी आक्रमक झाला आहे. यावर लवकरच तोडगा निघणार असून केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर लावण्यात आलेली बंदी लवकरच उठवण्यात येईल. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.

कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष रामराव भामरे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेटली. कांदा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER