
मुंबई : महाविकास आघाडीची आढावा बैठक संपली. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीची संयुक्तिक पत्रकार परिषद सुरू झाली आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज महाविकास आघाडीकडून फडणवीसांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने राज्याला केलेल्या मदतीचे आकडे सादर केल्यानंतर त्याला महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील तर शिवसेनेकडून परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित आहेत.
राहुल गांधींच्या हस्तक्षेपानंतर आज महाविकास आघाडीची संयुक्तिक पत्रकार परिषदेतून फडणवीसांच्या आकडेवारीला प्रत्युत्तर दिले.
बाळासाहेब म्हणाले?
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचं संकट आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अधिवेशन लवकर स्थगित करत कोरोनाविरोधाच्या लढ्याला सुरुवात केली. त्यानंतर केंद्र सरकारचा लॉकडाऊन सुरू झाला. त्याला आता दोन महिने होऊन गेले आहेत. या दोन महिन्यांच्या काळात जनजीवन विस्कळीत झालं आहे. उद्योग बंद पडले आहेत. लोकांना घरातच थांबावं लागतंय. या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार समर्थपणे काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत. असे बाळासाहेब थोरात यांनी आवर्जून सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला