मंदिर उघडण्यास आम्ही सक्षम; शिवसेनेनं एमआयएमला खडसावले

ambadas-danve-taunts-imtiaz-jaleel

औरंगाबाद : राज्य सरकारनं १ सप्टेंबरपासून राज्यभरातील मंदिरं खुली (Temple Open) करावीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मशिदी उघडू, अशी मागणी खासदार जलील यांनी केली होती. मात्र, सरकारनं ठोस निर्णय न घेतल्यानं एमआयएमने आता पुजाऱ्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मशिदींसाठी उद्यापासून मोहीम सुरू केली जाणार आहे. आणि या मुद्द्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि एमआयएम (MIM) समोरासमोर आली आहे. ‘मंदिर आणि मशीद ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही.

राज्य सरकार निर्देश देईल तेव्हा आम्ही मंदिरं सुरू करण्यास सक्षम असू’, असा टोला शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना लगावला आहे. चौथ्या टप्प्यातील सवलती सोमवारी राज्य सरकारनं जाहीर केल्या. त्यात ई-पास रद्द केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. मात्र, मंदिरे उघडण्याबाबत स्पष्ट काहीही सांगण्यात आले नाही. मंदिर-मशिदी उघडण्याची मागणी करणारी एमआयएम त्यामुळं आक्रमक झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे. ‘मंदिरे उघडण्याची मागणी हा जलील यांचा राजकीय स्टंट आहे’ असं दानवे यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही सोमवारी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले होते. त्यांना मुखदर्शनाची परवानगी देऊन लवकरच मंदिरं खुली करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

मंदिरं उघडण्याची नियमावली बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी आंबेडकर यांच्यासह अनेक जणांवर पंढरपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकरांची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या दिंडीचे स्वागतच – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER