वृत्तपत्र विक्रेत्यांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी द्या – मागणी

News Paper Vendor Mumbai

मुंबई : वृत्तपत्र विक्री अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे आम्हालाही लोकलमध्ये प्रवासाची परवानगी द्या, अशी मागणी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने महापौरांकडे केली. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे विश्वस्त जीवन भोसले आणि वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे शंकर रिंगे, राजेंद्र चव्हाण आणि अमोल खामकर यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची भेट घेऊन त्यांना याबाबत पत्र दिले.

अनेक वृत्तपत्र विक्रेते विरार, नालासोपारा आणि ठाणे परिसरात राहतात. ते वृत्तपत्र आणण्यासाठी लोकलशिवाय मुंबईला जाऊ शकत नाहीत. यामुळे मुंबईतील लाखो लोकांना वृत्तपत्र मिळत नाहीत, असे महापौरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER