आम्ही मातोश्रीचे आमंत्रण स्वीकारले ! – आशिष शेलार

Ashish Shelar

बीड : विरोधी पक्ष जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. पण लोकशाहीत संवाद असायला हवा, महाराष्ट्रात ही परंपरा आहे. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील तर स्वागत करायला पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. एकमेकांकडे जात राहिलं पाहिजे, असा टोला शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला होता. त्यावर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मीसुद्धा संजय राऊतांचं ते विधान ऐकलं आहे. आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे. आम्ही मातोश्रीचं आमंत्रण स्वीकारलं आहे.’ असं आशिष शेलार म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) समाजाची भावना तीव्र आहे. महाविकास आघाडीने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) मराठा समाजाचा एकप्रकारे कोल्ड ब्लडेड मर्डर केल्याची घणाघाती टीकाही शेलार यांनी केली. आम्हाला संपूर्ण मराठा आरक्षण हवं आहे. रोजगारामध्ये, नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवे आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या या आक्रोशाचे आम्ही समर्थन करतो. मराठा समाजाच्या आंदोलनात पक्षाचा झेंडा हाती न घेता सहभागी होणार आहोत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५ जून रोजी बीडमध्ये विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा होत आहे. या मोर्च्याला भाजपचा पाठिंबा आहे. आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत आणि लागू होईपर्यंत अन्य कुठल्याही ओबीसी किंवा इतर आरक्षणाला नख लावण्याचे काम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करू नये.

आज बोलणारे त्यावेळी आरक्षणाचा विरोध करत होते. आता भाजपला शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाकाने कांदे सोलू नका. मराठा समाजाची टिंगलटवाळी करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. मराठा समाजाला तीन हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button