वाझेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नायायालयाने फेटाळला, किरीट सोमैय्यांकडून अटकेची मागणी

Kirit Somaiya-Mansukh Hiren case-Sachin Waze

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren case) यांच्या हत्ये प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या अडचणी पुन्हा वाढला आहेत. कधीही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी करणारा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. त्यानुसार या प्रकरणातील महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तपास अधिकाऱ्यांचे या अटकपूर्व जामीन अर्जावर काय म्हणणे आहे, ते पुढील सुनावणीत मांडले जावे असे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यानुसार सचिन वाझे यांनी केलेल्या सचिन वाझेंच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर १९ मार्च रोजी होणार आहे.

तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वांझेना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न ठाकरे सरकारला विचारला आहे. ठाकरे सरकार वाझेंना वाचवत आहे. ठाकरे सरकार आणि पोलिसांनी मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचे कबूल केले आहे. मात्र असे असूनही त्यांना अटक झालेली नाही, असा प्रश्न सोमय्या यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER