वाझेचा लेटरबॉम्ब : पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे कोर्टाचे सीबीआयला आदेश

Sachin Vaze Letter Bomb

मुंबई :- राज्यात मागील काही दिवसांमधील दुसरा लेटर बॉम्ब पडलाय. एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने हा लेटर बॉम्ब टाकलाय. यात महाविकास आघाडी सरकारच्या ३ बड्या नेत्यांचा थेट उल्लेख झाला आहे. विशेष म्हणजे या लेटर बॉम्बमध्ये देखील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप झाला आहे.

दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. या प्रकरणात आता एनआयएबरोबरच आता सीबीआयकडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरून वाझे घुमजाव करू नये यासाठी खबरदारी घेतली गेली आहे. भादंवि १६४ अंतर्गत कोर्टान जबाब नोंदवला आहे यामुळे संबंधित पत्रात सत्यता नसेल किंवा जर वाझे यांनी जबाब फिरवला तर कोर्टाची दिशाभुल म्हणून वाझेला शिक्षा होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button