वाझेंचे पाय आणखी खोलात; सहकारी अधिकारीच होणार माफीचा साक्षीदार

sachin vaze - Ciu Officer - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा खेळ आता संपण्याची दाट शक्यता आहे. कारण आता सचिन वाझे (Sachin Vaze) प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील त्यांचेच सहकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे गुप्तवार्ता विभागातील निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि हिरेन मनसुख मृत्युप्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करून आणल्या होत्या. याशिवाय, सचिन वाझे राहात असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्युप्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती आहे. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांचा खेळ संपण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER