एनआयएला सापडली वाझेची डायरी, १०० कोटींचं गूढ उकलणार

Sachin Vaze

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. अटकेनंतर एनआयएने (NIA)वाझे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता अनेक वस्तू मिळाल्या आहेत. त्यापैकी एक वस्तू मोठे खुलासे करेल असं एनआयएने दावा केला आहे.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना सचिन वाझे यांच्या कार्यालयात एक डायरी सापडली (Waze’s diary found by NIA) आहे. ज्यामध्ये पैशाच्या झालेल्या व्यवहाराबाबत एन्ट्री दिसते आहे आणि कोडरवर्डमध्ये ही काही नोंदी दिसत आहेत. बार, रेस्टॉरंट्स आणि इतर गोष्टींमधून गोळा झालेल्या पैशांच्या व्यवहाराची ही डायरी असू शकते. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी १६ मार्च रोजी सीआययू कार्यालयात छापा टाकला. त्यावेळा त्यांना तेथे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि काही कागदपत्रे मिळाली होती. तेव्हा त्याच छापेमारीदरम्यान एनआयएला तिथून एक डायरीही मिळाली ज्यात बऱ्याच पैशाच्या व्यवहारांची नोंद आहे.

एनआयएच्या एका वरिष्ठ अधिका्ऱ्याने सांगितले की, त्यांना एक डायरी मिळाली आहे पण त्यात काय आहे का याची चौकशी सुरु आहे. डायरीची तपासणी अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता एनआयए लवकरच या प्रकरणात ईडीला पत्र लिहू शकते आणि या प्रकरणातील मनी लाँडरिंग अँगलने चौकशी करण्यास सांगू शकते.

ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन यांची हत्याच; एटीएस प्रमुखांकडून खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER