वाझे प्रकरण : एनआयने जप्त केली ९६ लाखांची प्रॅडो, ५५-५५ लाखांच्या २ मर्सिडीज

NIA Seizes Car - Sachin Vaze Case

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात एनआयएने तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणात एनआयएने आज एक अजून एक प्रॅडो आणि एक मर्सिडीज कार जप्त केली. सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत स्कार्पिओला धरून एकूण ६ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. आता एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी सुरु आहे. त्यामुळे या गाडीतून आता काय धागेदोरे मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी एनआयएने एक स्पॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे.

आज दुपारी एनआयएने दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती कार्यालयात आणली. त्यानंतर एनआयए अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. एनआयएने पहिल्यांदा स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली. पुढे सचिन वाझेंच्या चौकशीनंतर एक मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

एनआयएने आतापर्यंत 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहे. शिवाय एनआयएने जी टोयोटा प्रॅडो गाडी ताब्यात घेतली आहे, ती अत्यंत महागडी आहे. बेसिक मॉडेलची किंमत ९६ लाख ३० हजारांपासून सुरु होते. या गाडीची इंजिन क्षमता २९८२ सीसी इतकी आहे. या कारचं मायलेज ११ किलोमीटर प्रतिलीटर आहे. ऑटोमेटिक गिअर सिस्टिम आणि ७ सीटर असलेल्या या भारदस्त कारमध्ये ७ एअरबॅग्ज आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER