वाझे आणि काझीच्या न्यायालयीन कोठडीत ५ मेपर्यंत वाढ

Vaze and Qazi judicial custody extended - Maharastra Today

मुंबई : अँटालिया स्फोटकेप्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्युप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेला चांगलाच झटका बसला आहे. वाझेसह निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझी या दोघांनाही ५ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी वाझेनी केलेल्या एकूण तीन मागण्यांपैकी दोन मागण्या न्यायालयाने फेटाळल्या. या प्रकरणी आज NIAच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली.

पेन कागद देण्यास मनाई

सुनावणी दरम्यान, सचिन वाझेनी न्यायालयाकडे एकूण तीन मागण्या केल्या. यामध्ये वाझेनी आपल्या वकिलामार्फत एक पेन, कागद आणि कार्बन पेपर मिळावा, असे म्हटले होते. मात्र, वाझेची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. त्याचबरोबर वैद्यकीय उपचारासंदर्भातली औषध मिळावी, यासाठीसुद्धा वाझेनी दुसरा अर्ज केला होता. सोबत प्रिस्कीप्शन जोडा असा युक्तिवाद यावेळी NIAच्या वकिलांनी न्यायालयात केला. वाझेनी दैनंदिन वापरात लागणारे साहित्य मिळावे, अशीसुद्धा न्यायालयाकडे विनंती केली. मात्र, तो अर्जसुद्दा न्यायालयाने फेटाळला.

दरम्यान, मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नाही, तर पोलीस निरीक्षक सुनील माने असल्याचा दावा NIAने कोर्टात केला आहे. मनसुख हिरेनप्रकरणात सुनील मानेला अटक केली आहे. सुनील माने यानेच फोन करून मनसुख हिरेन यांना बोलावले होते. सुनील माने मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित होते, असे NIAने कोर्टात सांगितले. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सध्या त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button