निरा देवघर धरण : पवारांनी पुन्हा दुष्काळी भागाचे पाणी पळवले

nira-deoghar-dam-Uddhav Thackeray

मुंबई : फडणवीस सरकारने निरा देवघर आणि गुंजवणी धरणातून बारामतीकडे जाणारं पाणी बंद केलं होतं. मात्र महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय रद्द करून, निरा उजवा आणि डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने ठाकरे सरकारने भाजपाला आणखी एक दणका दिला आहे.

भाजपा सरकारच्या काळात इंदापूर, बारामतीचे पाणी बंद केले होते. ते आज महाविकास आघाडी सरकराने निर्णय घेत परत दिल्याबद्दल आनंद आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो, असे राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले.

काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत, निरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे, शिल्लक राहणारे पाणी निरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिली.

अजित पवारांमुळे आघाडीच्या मंत्र्यांचा हिरमोड, बंगल्यांवर मर्यादित खर्च करण्याचे आदेश