रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा वाढला; ३४ धरणे ओव्हरफ्लो

Dam Overflow

रत्नागिरी(प्रतिनिधी):  रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक वाढला आहे. या पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ धरणांपैकी ३४ धरणे पूर्णांशाने भरून वाहू  लागली आहेत. यामध्ये दोन  मध्यम प्रकल्पांचाही समावेश आहे.

गडनदी आणि अर्जुना या दोन मध्यम प्रकल्पांतदेखील १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलेला आहे. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस चांगलाच बरसत असल्याने काही धरणे १०० टक्के भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील २, दापोलीतील ५, खेडमधील ४, चिपळूणमधील ७, गुहागरमधील १, संगमेश्वरमधील ५, रत्नागिरीतील १, लांजा तालुक्यातील ५, राजापूरमधील ४ अशी जिल्ह्यातील ३४ धरणे १०० टक्के भरली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER