
रत्नागिरी : उन्हाळा शेवटाकडे जात असताना रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या 17 हजार 208 लोकांना टंचाईची झळ बसत आहे. सध्या 63 गावातील 128 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मागील आठवड्यात उष्मा वाढल्यामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. गेल्या आठवड्यात 48 गावातील 88 वाड्यांना 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत होता. आठ दिवसांमध्ये 40 वाड्यांची त्यात भर पडली आहे. सर्वाधिक टंचाई खेड, चिपळूण, संगमेश्वर या तीन तालुक्यांना जाणवत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला