शहापुर तालुक्यात पाणी टंचाई गावपाड्यांसाठी टँकरच्या प्रस्ताव मंजूरीच्या प्रतिक्षेत

ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यात यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यात कसारा गावातील अन्य पाच गावपाड्यांना देखिल पाणी टंचाईची समस्या भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्‍वभुमीवर शहापुर पंचायत समितीमार्फत टँकरने पाणी पुरवाठ करण्यात बाबतचा प्रस्ताव पाठवून 27 दिवस उलटूनही प्रस्तावाला मंजूरी अद्यापही मंजूरी न मिळाल्याने हे प्रस्ताव मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. ठाणे जिल्ह्यात साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहापुर तालुक्यातील अजनुप कोळी पाडा येथे दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात आल्याने यंदा भीषण पाणी टंचाईची संकेत आता पासूनच मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री विलासरावांवर चित्रपट, रितेश देशमुखला प्रतीक्षा संहितेची!

जिल्ह्यातील शहापुर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालु्नयातील ग्रामीण भागात साधारणत: दरवर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या पहिल्या अथवा दुसर्‍या आठवड्यात पाणी टंचाईच्या समस्या भेडसावू लागण्यास सुरुवात होवून त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असतो. त्यात यंदाच्यावर्षी जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखिल पावसाने दमदार हजेरी लावली असून अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने देखिल पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्यावर्षी पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहापुर तालुक्यातील अजनुप कोळीपाडा टँकरने पाणी पुरवठ्याला सुरुवात झाली आहे. त्यात या पाडाची लोकसंख्या 330 इतकी असून त्या पाडायावरील असलेली विहीर देखिल कोरडी पडली असल्याने या पाड्यावरील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात आता, त्याच तालुक्यातील दांडा, चिंतामणवाडी, नारळवाडी, पारधीवाडी या गावांना देखिल पाणी टंचाईच्या झळा पोहचण्यास सुरुवात झाली असून या पाड्यांना देखिल टँकरने पाणी पुरवठा व्हावा, याबाबातचे प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे. मात्र, या प्रस्तावांना अद्यापही मंजूरी न मिळाल्याने हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, यंदाच्यावर्षी पावसाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच शहापुर आणि मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. असे असतांना देखिल फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहापुर तालुक्यातील पाच पाड्यांवर पाणी टंचाईच्या झाळा पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईची संकेत आता पासूनच मिळत आहे.