आटपाडी तालुक्यातील 53 गावांचा पाणी प्रश्न मिटणार-खासदार संजय पाटील

sanjay Patil

सांगली : मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेेल्या बैठकीत आटपाडी तालुक्यातील 53 गावाचा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.

खासदार पाटील आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख ,प्रधान सचिव- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग ,सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई व विभागाचे संबंधित अधिकारी यांचे उपस्थितीत सोमवारी बैठक पार पडली.

या बैठकीत आटपाडी तालुक्याच्या 53 गावांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे जे लक्ष वेधले ,त्यास गांभीर्यपूर्वक घेऊन तात्काळ सदर काम चालू करण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी दिले. त्यामुळे बरेच दिवसापासून प्रलंबित असलेला हा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.