वॉल स्ट्रीटवर सोने आणि तेलाच्या यादीत असेल पाणी !

Water

सीएमई ग्रुप या आठवड्यात प्रथमच पाण्याच्या ‘स्पॉट प्राइसशी निगडित वायदा करार’ सुरू करणार आहे. या करारामुळे गुंतवणूकदार आणि शेतकर्‍यांना पाण्यातून पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. यासाठी कंपनीने १.१ अब्ज डॉलर्सचे करार केले आहेत. यानंतर वॉल स्ट्रीटवर सोने, तेल आणि इतर वस्तूंच्या खरेदीमध्ये पाण्याचाही समावेश होणार आहे.

पाण्याचे कंत्राट दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘नॅस्डॅक वेल्स कॅलिफोर्निया वॉटर इंडेक्स’शी जोडलेले आहेत. कॅलिफोर्नियाच्या (California) पाच सर्वांत मोठ्या आणि सर्वांत जास्त सक्रिय असलेल्या व्यापार जल बाजारपेठेत हे व्यवहार चालतात.

नव्याने सुरू झालेल्या या जल बाजारपेठेत भविष्यात गुंतवणूक करण्याचा विचार एक मोठे गुंतवणूकदार ‘द बिग शॉर्ट’चे मायकेल बुरी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणालेत, लोकसंख्यावाढीमुळे आणि हवामान बदलामुळे जीवनावश्यक नैसर्गिक स्रोतांचा पुरवठा घटत चालला आहे. अनिश्चित वातावरणीय वातावरणामध्ये शेतकरी गुंतवणूकदारांपेक्षा पाण्याच्या कराराचा अधिक वापर करतील.

सध्या जगात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता आढळते आहे. २०१५ पर्यंत जगात दोन तृतीयांश लोकसंख्या पाण्याच्या दुर्भिक्षाला बळी पडलेली असेल. या स्थितीत व्यापार जगत आणि समाजात पाण्याची उपलब्धता हा मोठा विषय ठरणार आहे, असे सीएमई ग्रुप ग्लोबल हेड, टिम मॅककोर्ट म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER