पाण्याचा वाद : शिवसेनेच्या आमदाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, काँग्रेसचा इशारा

Shivsena & Congress

अंबरनाथ : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी ऐतिहासिक आघाडी निर्माण झाली आहे मात्र, स्थानिक पातळीवरील सर्व गणितं जुळली असे नाही. अंबरनाथमध्ये पाण्याचा प्रश्नावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला. शिवसेना आमदाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

अंबरनाथ शहरात पाणी पुरवठा अनियमित होतो. काँग्रेसने आज पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. शहरातील अनेक भागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करताना दुजाभाव करते, असा आरोप करत पाणी टाकीवर चढून काँग्रेसने पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ घोषणा दिल्यात.

शहरातील इतर समस्या नगरसेवक सोडवतात, आमदारांनी निदान पाणी प्रश्न तरी सोडवावा, मात्र निवडून आल्यानंतर आमदारांना अहंकार ते कोणाची दखल घेत नाहीत. खासदार आणि पालकमंत्र्यांनी आमदारांना समज द्यावी अन्यथा त्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा अंबरनाथ काँग्रेसने दिला.

अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर या आंदोलनाबाबत म्हणालेत, हे आंदोलन शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आणि फसवे आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देयकाची थकबाकी होती. आज ४ कोटी ३८ लाख रुपये एमआयडीसीला भरले आहे. शिवाय वाढीव ४ एमएलडी पाणीदेखील शहराला मिळणार असल्याने पाणी समस्या दूर होणार आहे. केवळ पालिका निवडणूक जवळ आल्याने शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे आंदोलन केले जाते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER