राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम

मुंबई :- शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी आता राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. या उपक्रमांतर्गत मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी ठराविक वेळेत बेल वाजवण्यात येणार आहे. या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेत पाणी पिता येणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा घंटा वाजवण्याबाबत मुख्याध्यापकांनी वेळ निश्चित करावी, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी विविध समित्यांचे होणार गठण; वर्षा गायकवाड

राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता असणे, हे आजार होण्याचे मुख्य कारण आहे. आवश्यक तेवढे पाणी न पिल्याने अनेक आजार होण्याचा धोका असतो. मुले शाळेत जाताना पाण्याची बाटली बरोबर नेतात; पण शाळेतून घरी आल्यानंतर बाटली पाण्याने भरलेली असते, अशी पालकांचीही तक्रार असते. मुले शाळेत असली की पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देणे आवश्यक ठरते. ठराविक प्रमाणात नियमित पाणी पिले की अनेक आजारांना दूर ठेवता येते. आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देणे; तसेच त्यांना नियमित पाणी पिण्याची सवय लागावी, यासाठी हा उपक्रम राज्यातील शाळेत राबवण्यात येणार आहे.


Web Title : ‘Water Bell’ Activities in all schools in the state

Maharashtra News : Latest Mumbai Marathi News only on Maharashtra Today