हसन मुश्रीफ यांच्या आरोग्यासाठी जलभिषेक

Hassan Mushrif

कोल्हापूर :  गेल्या दोन दिवसापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif)यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कोल्हापुरात दिवसागणिक कोरोनाचा विळखा वाटत आहे. यात आता लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची बाधा होवू लागली आहे. मंत्री मुश्रीफ यांना कोरोनाची (Corona Positive) लागण होताच मुश्रीफ प्रेमींनी ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी देवाला साकडे घातले आहे.

मुरगूड च्या माता-भगिनींचे ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीला साकडे घातले. आई अंबाबाई, गरिबांचा कैवारी मुश्रीफ साहेबांना लवकरच कोरोनामुक्त कर… मुश्रीफ साहेब, लवकर बरे होऊन सुखरूप घरी या…जनता तुमची वाट पाहतेय… साहेब, लवकर बरं व्हा…यासाठी ग्रामस्थांनी डोक्यावर पाण्याचे कलश घेऊन मिरवणुकीने अंबाबाई देवीला जलाअभिषेक केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER