माजी हॉकी खेळाडू युवराज वाल्मिकीच्या घरातही घुसले पाणी ; सरकारला मागितली मदत

Yuvraj Valmiki

मुंबई : मुंबईतील मुसळधार (Mumbai Rains) पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. भारतीय हॉकी स्ट्रायकर युवराज वाल्मिकीला (yuvraj walmiki) यावेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे .

बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी अडीच ते तीन फूट पाणी भरल्याच पाहायला मिळालं आणि याच साचलेल्या पचण्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडूलाही सामना करावा लागला. युवराजने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो आपल्या घराच्या ड्रॉईंग रूममधून घोट्याच्या पातळीचे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 28 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये युवराजने बृहन्मुंबई महानगर पालिका तसेच महाराष्ट्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मदत मागितली. मुंबई महानगर क्षेत्रात ‘अति मुसळधार’ पावसाचा इशारा देण्यात आल्याने आयएमडीकडून रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER