हा व्हिडीओ आता पाहिला; स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही

Yuvraj Sambhajiraj Chhatrapati

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टी झाली आणि कोल्हापूर, सातारा, सांगलीकरांना महापुराने वेढले. या महापुरात येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. त्यांना सावरण्यासाठी महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यांचा मोडलेला संसार, तुटलेल्या मनांना सावरण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संवेदनशील राजकीय नेते, महाराष्ट्र सरकार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत दिली जात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत येत आहे. असे असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली होती.

ही बातमी पण वाचा : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्सकडून ५ कोटींची मदत

याबाबत आज भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केले आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचं प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे, असे संभाजीराजे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये नमूद केले आहे.