आज रात्री पाहा भारतीय लष्कराची शौर्यगाथा

Indian Army - History TV 18

राजस्थानच्या चटके देणाऱ्या वाळवंटापासून ते सियाचेनच्या हाडे गोठवून टाकणाऱ्या बर्फापर्यंत भारतीय लष्कर (Indian Army) 24 तास तैनात असते आणि ते आपल्या सगळ्यांचे डोळ्यात तेल घालून रक्षण करीत असते, पृथ्वीवरील सर्वांत कठीण परिसराच्या काही भागांमधून भारतीय सीमा जाते. सीमेवरून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न दुश्मन करीत असतो. पण भारतीय लष्करातील स्त्री, पुरूष सातत्याने 24 तास दक्ष असतात. लष्करी अधिकारी आणि यंत्रणांपर्यंत विशेषरित्या पोहोचताना भारताच्या रक्षकांसोबत अॅक्शनपॅक्ड २४ तासांची क्षणचित्रे हिस्ट्री टीव्ही 18 प्रेक्षकांसाठी आज रात्री नऊ वाजता घेऊन येत आहे.

तसे पाहायला गेले तर भारतीय लष्कराबद्दल जनतेला खूप कमी प्रमाणात माहिती असते. हेच लक्षात घेऊन ‘इंडियन आर्मी 24 अवर्स’ या नावाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यात भारतीय लष्कराच्या टीम्स, त्यांचे डावपेच आणि तंत्रज्ञान यांचे काम २४ तास कसे चालते हे यात दाखवले जाणार आहे. या एक तासाच्या चित्रपटासाठी अनेक दिवस संशोधन करण्यात आले आहे. दिवसाचे चोवीस तास दक्ष राहण्यासाठी आणि युद्धासाठी सज्ज राहण्यासाठी भारतीय सैन्याला काय आवश्यक आहे ते यात दाखवले जाणार आहे. या शोमध्ये पॉवरपॅक्ड रिअल लाइफ अ‍ॅक्शन सिक्वेन्स आणि युद्धजन्य परिस्थितीचे नाट्यमय रूपांतरण करण्यात आले आहे. युद्धातील काही सर्वोत्तम प्रसंगही यात दाखवण्यात आले असून विविध युनिट्सचे काम कसे चालते हे दाखवण्यासोबतच लष्करातील काही अत्यंत बुद्धिमान तरूण अधिकाऱ्यांच्या मुलाखतीही दाखवल्या जाणार आहेत.

यात आर्मर्ड कॉर्प्स, इंजिनीअर्स, सिग्नल्स कॉर्प्स, आर्मी एव्हिएशन आणि स्पेशल फोर्सेस यांच्या कामगिरीची माहिती दिली जाणार आहे. हिस्ट्री टीव्ही 18चा हा चित्रपट प्रेक्षकांना स्फोटक घटनांच्या शक्य तितक्या जवळ घेऊन जाणारा आहे. भारतीय लष्कराचे सातत्यपूर्ण प्रयत्न, कार्यक्षमता आणि अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांची सुसज्जता प्रेक्षकांना दाखवली जाणार आहे. प्रतिष्ठेच्या भारतीय मिलिटरी अकॅडमीच्या सुरक्षित संकुलापासून ते सियाचेन ग्लेशियरच्या बर्फाळ टोकापर्यंत, बोफोर्स तोफांच्या युनिटच्या आतून ते निर्भय घातक कमांडोजना वाहून नेणारे चॉपर आणि इतर अनेक गोष्टी प्रेक्षकांना या शोमध्ये पाहता येणार आहेत.

या शो चे २४ तासांचे घड्याळ मध्यरात्रीच्या थोड्या वेळानंतर एलओसीलगत बॉर्डरवरील गस्तीपासून सुरू होते आणि त्यानंतर शत्रूच्या रेषेमागे कमांडोंची धाड दाखवली आहे. अत्यंत तणावपूर्ण, सावधगिरीची सुरूवात केल्यानंतर पाठोपाठ प्रतिष्ठित पॅराट्रूपर स्पेशल फोर्सेस दाखवल्या आहेत. त्या दोन हाय-व्हॅल्यू दहशतवादी लक्ष्यांना निकामी करतात. पहाट होत असताना कथानक भारतीय लष्कराच्या विविध विभागांची माहिती देते. त्यांचे चित्रिकरण प्रत्यक्षात केले असून खरोखरचे स्फोट आणि गोळीबार करण्यात आले आहेत. फिल्ममध्ये दिवस पुढे जातो तसतसे, प्रेक्षकांना हाय-टेक गुप्तचर आणि कमांडो एकत्र येताना दिसतात. त्यात सिग्नल कॉर्प्सचे स्त्री आणि पुरूष आहेत. ड्रोन्स उड्डाण करतात आणि या टीम्स चालत असताना नजरेच्या टप्प्यात येत नसल्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात आणि नजरा आकाशात राहतात. कोणताही अडथळा आला तरी भारतीय लष्कराचे अभियंते माणसे आणि साहित्य कशाप्रकारे पुढे नेतात हेही आपल्याला पाहता येते. वाळवंटात रस्ते बनवले आहेत, भूसुरूंग साफ केले जातात आणि इंजिनाची समस्या असलेल्या तोफेची सुटका केली जाते आणि त्याचवेळी शत्रूकडून गोळीबार सुरू असतो. दुसरीकडे रस्त्यातून जात असताना तोफेच्या नळीतून स्फोटक बाहेर पडल्यामुळे आपल्याला आतषबाजी पाहायला मिळते आणि युद्धाच्या तोंडावरच पायदळ वेगळे होऊन ते धाडसी कृत्ये करतात. गोळीबार होतो, कुक्री चमकतात आणि हे सर्व प्रेक्षकांना समोरासमोर पाहता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER