कोरोनाच्या लढाईत कुचराई चालणार नाही; उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सूचना

Ajit Pawar - Maharastra today
Ajit Pawar - Maharastra today

बारामती : बारामती शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अमलबजावणी युद्धपातळीवर करा. रुग्णांच्या वाढत्या संख्यांवर नियंत्रण मिळवावेच लागेल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुचराई चालणार नाही. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घ्यावे. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

सरकारी संस्था आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने आम्ही लवकरच कोरोना संकटावर नियंत्रण मिळवू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना संसर्ग निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

“सद्यस्थितीत बारामती शहर व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. ही बाब चिंतेची असून संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत, नागरिकांकडून त्या निर्बंधांचे पालन केले जाईल. सार्वजनिक ठिकाणी तसेच इतर गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घ्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा. वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसेच निधीचीही कमरतरता पडू दिली जाणार नाही. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, प्रशासनास सहकार्य करावे, ऑक्सिजन वापराबाबतही सर्व रूग्णालयांनी काळजीपूर्वक वापर करावा.” असेही पवार म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पदाधिकारी, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. डॉ. देशमुख म्हणाले की, “ज्या भागामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे. त्याठिकाणी कडक निर्बंध करावेत. आरोग्य विभागामध्ये भरतीप्रक्रिया सुरू केली असून मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. ऑक्सिजनपुरवठा करण्यात येईल, परंतु गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रूग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिवीर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल, तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करावी. आरोग्यविषयक कोणत्याही साधन सामुग्रीची कमतरता असल्यास तत्काळ कळवावे, सुपर स्प्रेड गावनिहाय यादी करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. पोलीस विभागाने विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button