सोशल मीडियावर वसिम जाफरच्या व्टिटसची धमाल, कोड्यातून सुचवला फलंदाजीचा क्रम

Wasim Jaffer

अलीकडे अतिशय मार्मिक आणि हजरजबाबी व्टिट करण्यात वसिम जाफरने (Wasim Jaffer) विरेंद्र सेहवागवर आघाडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे व्टिट सतत चर्चेत आहेत. सोमवारी सकाळीच भारतीय संघाला सिडनी कसोटीसाठी (Sydney Test) शुभेच्छा देताना एक कोडे टाकलेय आणि त्याच्या फॉलोअर्सना ते ‘डिकोड (Decode) ‘ करायचे आवाहन त्याने केले आहे.

आपल्या या व्टिटमध्ये जाफरने म्हटलेय, ‘Today I had nice filter coffee by the lake. Amazing how fish can breathe underwater. Then I walked past a potrait of Che Guevara before bumping into an old pal from Dombivali who now has a restaurant in Borivali.
Btw good luck for SCG test @ajinkyarahane88 #Decode 😉 #AUSvIND

अर्थात चाहत्यांनीही त्याचे कोडे डिकोड करायला अजिबात वेळ घेतला नाही आणि फटाफट त्याचा उलगडा केला. चाहत्यांनी केलेल्या उलगड्यानुसार ‘फिल्टर कॉफी’ म्हणजे के.एल. राहुल, ‘फिश ब्रिद’ म्हणजे शुभमान गील, ‘चे गवारा’ म्हणजे चेतेश्वर पुजारा, ‘डोंबिवली’ म्हणजे अजिंक्य रहाणे आणि ‘बोरिवली’ म्हणजे अर्थातच रोहित शर्मा.

यातून वसिम जाफरने सिडनी कसोटीत भारतीय फलंदाजांचा क्रम कसा असावा हे सुध्दा सुचित केले आहे. जाफरच्या कोड्याचा अर्थ काढायचा तर सलामीला राहुल व गील, तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार रोहित शर्माने खेळायला हवे असे तर त्याला सुचवायचे नाही ना…याची चर्चा आहे. काही जणांनी रेस्टॉरंटशी ऋषभ पंतचेही नाव जोडले आहे.

याआधीसुध्दा रविवारी त्याने आॕस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या मंत्र्यांच्या विधानावर पोस्ट केलेले मीम चर्चेत होते. क्वीन्सँडच्या आरोग्य मंत्री रॉस बेटस यांनी भारतीय संघाला कोरोनाबाबतचे नियम पाळायचे नसतील तर त्यांनी चौथ्या कसोटीसाठी क्वीन्सलँडमध्ये (ब्रिस्बेन) येऊच नये असे म्हटले होते.

आरोग्यमंत्री बेटस् यांच्या कठोर भूमिकेला क्वीन्सलँडचे क्रीडामंत्री टीम मँडर यांनीसुध्दा सहमती दर्शवली आहे. मँडर यांनी म्हटलेय की, नियमांबाबत अजिबात ढिलाई होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला ठरलेल्या नियमावलीचे पालन करावेच लागेल.

याला जोरदार उत्तर देणाऱ्या मीममध्ये जाफरने उल्लेख केलाय की, आॕस्ट्रेलियन मंत्री म्हणतात, खेळायचे तर आमच्या नियमांनुसार नाहीतर येऊच नका..

आणि या मीममध्ये दाखवलेल्या तरुणाच्या पाठीवर बॕग दिसतेय आणि त्यासाठी जाफरने ओळ लिहिलीय..

भारतीय संघ आपल्या बॕगमध्ये बोर्डर- गावसकरट्रॉफीसह ..म्हणजे भारतीय संघ ही मालिका जिंकून विजेतेपदाची बोर्डर- गावसकर ट्रॉफी घेऊन फिरणार असल्याचे त्याने सुचवले आहे.

“Aus minister: “Play by our rules or don’t come”.
Indian team with Border-Gavaskar trophy in the bag,”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER