वसिम जाफरने म्हणे ‘जय श्रीराम’ म्हणण्यास मनाई केली, जाफरकडून आरोपांचा इन्कार

Wasim Jaffer

माजी कसोटीपटू व रणजी स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज वसिम जाफर (Wasim Jaffer) याने संघनिवडीतील हस्तक्षेप आणि निवडकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून अयोग्य खेळाडूंच्या संघात निवडीचा अवाजवी आग्रहाला कंटाळून उत्तराखंड (Uttarakhand) रणजी संघाचा प्रशिक्षकपदाचा राजिनामा दिला आहे. त्याचे हे आरोप आणि राजिमान्यानंतर आता जाफरवरसुद्धा जायीयवादी असल्याचे आरोप करण्यात आले आहेत परंतु त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. आपण जातियवादी असतो तर आपल्याला राजिनामा देण्यापेक्षा संघटनेनेच आपली हकालपट्टी केली असती असा मुद्दा त्याने मांडला आहे.

बायो बबलमध्ये मौलवीसाठी आग्रहापासून मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य व झुकते माप देत असल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत. बातम्या व सोशल मीडियातून करण्यात आलेले हे आरोप अतिशय थिल्लरपणाचे असल्याचे जाफरने म्हटले आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडताना त्याने म्हटलेय की, आपल्यावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याला दिलेली जातीयवादाची किनार क्लेशदायी आहे. त्यामुळे मला माझी बाजू स्पष्ट करावी लागत आहे. सर्व जण मला दीर्घकाळापासून ओळखून आहेत आणि मी कसा आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. मला फलंदाजीच्या क्रमाबाबत करण्यात आलेली कोणतीही सूचना मी स्वीकारली नाही. सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत ज़्या खेळाडूंबद्दल मला विश्वास होता त्यांनाच आपण खेळवले. शेवटच्या सामन्यासाठी आपण समद फल्ला यालासुध्दा वगळले. मी जर जातीय पक्षपात करणारा असतो, तर समद फल्ला व मोहम्मद नझीम यांना सर्वच सामन्यांत खेळवले असते. अशा गोष्टी करणे किंवा त्यांचा विचारसुध्दा मनात आणणे थिल्लरपणा आहे. संघातील २२ खेळाडूंपैकी फक्त तीनच खेळाडू मुस्लीम होते. मला उलट नवीन खेळाडूंना संधी द्यायच्या होत्या. मी जातियवादी असतो तर जय बिस्ताला मी आणलेच नसते. मी तर त्याला कर्णधारसुद्धा करणार होतो पण निवडकत्यांनाच नेतृत्वासाठी इकबाल अब्दुल्ला अधिक योग्य वाटल्याचे त्याने स्पष्ट केले.

टीम हडलमध्ये खेळाडूंना ‘जय श्रीराम’ व ‘जय हनुमान’ म्हणण्यास आपण मज्जाव केल्याच्या चर्चेचाही त्याने इन्कार केला. मुळात खेळाडू हा घोष करतच नव्हते. सराव सामन्यांवेळी खेळाडू ‘रानी मात सच्चे दरबार की जय’ अशा घोषणा करायचे. हा जयघोष शीख समुदायाचा आहे आणि आमचे दोन खेळाडू त्यांच्यापैकी होती मात्र खेळाडूंना ‘जय श्रीराम’ व ‘जय हनुमान’ म्हणताना मी ऐकलेले नाही. बडोदा येथे सामन्यांसाठी गेल्यावर मी त्यांना एवढेच सूचवले की, आपण एखाद्या विशीष्ट समुदायासाठी नाही तर उत्तराखंडसाठी खेळतोय म्हणून ‘गो उत्तराखंड’, ‘लेटस्‌ डू इट उत्तराखंड’, कम ऑन उत्तराखंड अशा घोषणा देणे योग्य राहिल. विदर्भ संघासोबत चंद्रकांत पंडीत असेच करायचे कारण ११-१२ जे काही खेळाडू असतात ते एकाच समुदायाचे नसतात. त्यामुळे या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. मी जातीयवादी असतो तर त्यांना मी ‘अल्लाह ओ अकबर’ म्हणायला लावले असते पण तसे मी केलेले नाही. बायो बबलमध्ये मौलवींना बोलावण्याचा निर्णयसुध्दा आपला नव्हता. इकबाल अब्दुल्लाने त्यांना शुक्रवारी बोलावले होते असे जाफरने स्पष्ट केले. नमाजला जाता येईल अशा पध्दतीने मी सरावाच्या वेळासुध्दा ठेवलेल्या नव्हत्या हे त्याने निदर्शनास आणून िदले.

संघनिवडीत उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव महिम वर्मा यांचा हस्तक्षेप होता आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी संघ निवडतानासुध्दा आपले मत निवडकर्त्यांनी घेतले नाही असा आरोपही त्याने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER