वॉशिंग्टन : महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; खलिस्तानी झेंड्याने झाकला चेहरा

Mahatma Gandhi Statue

वॉशिग्टन : कृषी कायद्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद उमटत आहेत. खलिस्तानवादी याचा फायदा घेत आहेत. त्यांनी  वॉशिंग्टन  येथील भारतीय दूतावासासमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली. खलिस्तानी झेंड्याने महात्मा गांधींचा चेहरा झाकला.

भारतीय दूतावासाने या घटनेची माहिती दिली. दूतावासाने या घटनेचा तीव्र निषेध केला. शांती व न्यायाचे प्रतीक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असे दूतावासाने म्हटले आहे. दूतावासाने अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER