रामायण, महाभारत काळात केवळ हिंदूच होते का? केआरकेला कंगनाने दिले उत्तर

हिंदू हा धर्म नाही, ओळख

Kangana Ranaut - Kamaal R. Khan

मुंबई : अभिनेता कमाल आर. खान (Kamaal R. Khan) त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. तो विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. मात्र यावेळी तो चर्चेत आहे भारतीय पौराणिक कथांमुळे! महाभारत, रामायणाच्या काळात आपल्या देशात केवळ हिंदूच होते का? असा प्रश्न त्याने विचारला. या प्रश्नाला उत्तर दिले कंगनाने (Kangana Ranaut) – हिंदू हा धर्म नाही ओळख आहे. तिचे उत्तर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“शास्त्र, खगोलशास्त्रीय गणना आणि नक्षत्रांच्या स्थानानुसार रामायण ७००० वर्षांपूर्वी व महाभारत ५००० हजार वर्षांपूर्वी घडले होते. याचा अर्थ त्याकाळात केवळ हिंदूच होते का?” असा प्रश्न कमाल खानने विचारला होता. त्याच्या या प्रश्नावर कंगना उत्तर दिले.

“हिंदू हा धर्म नव्हता तर ती एक ओळख होती. ज्या व्यक्तीचा जन्म हिंद महासागर आणि हिमालय यांच्या दरम्यान व्हायचा त्याला हिंदू म्हणायचे. त्या काळात धर्म ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. योग आदिकाळापासून आहे. त्यानंतर हिंदू आयकॉन राम आणि कृष्ण आले.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने केआरकेच्या प्रश्नाला उत्तर दिले. दोघांचेही ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER