शूटिंग होते का? शिवराजसिंह चौहान यांनी प्रियंका आणि राहुलला मारला टोमणा

Shivraj Singh Chauhan - Rahul Gandhi - Priyanka Gandhi - Maharastra Today

नहरकाटिया (आसाम) : पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुमाळी सुरू आहे. प्रियंका आणि राहुल गांधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाट्यमय कृती करत आहेत. यावर भाजपाचे (BJP) नेते व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण (Shivraj Singh Chauhan) यांनी प्रचारसभेत टीका केली.

हंगाम नसताना प्रियंकाने केली तोडणी !

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचा आसाममधल्या चहाच्या मळ्यांमध्ये तिथल्या महिला मजुरांसोबत चहाची पाने खुडतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून शिवराज सिंह चौहान यांनी टीका केली – चहाच्या पानांच्या खुडणीचा हंगाम नसताना प्रियंका गांधी चहाच्या पानांची खुडणी करत होत्या ! चहाची पाने खुडत होत्या की चित्रपटाचे शूटिंग करत होत्या?

राहुल गांधी यांनी मारली समुद्रात उडी !

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा पुद्दुचेरीमधील कोळी बांधवांसोबत पाण्यात बुडी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर टीका करताना चौव्हान म्हणालेत – एकीकडे राहुलजी थेट समुद्रात सूर मारत आहेत, तर दुसरीकडे प्रियांकाजी हंगाम नसताना चहाच्या मळ्यांमध्ये चहाची पाने खुडताना दिसत आहेत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER