कंगनाला ‘हरामखोर’ नाही तर, ‘नॉटी गर्ल’ म्हणायचे होते; संजय राऊतांची सावरासावर

Sanjay Raut & Kangana Ramaut

मुंबई : मुंबई (Mumbai) शहराबद्दल अपशब्द आणि मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे. मात्र आता संजय राऊत यांनी कंगनाला ‘नॉटी गर्ल’ असे म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यावर सावरासावर करताना केंद्रावरही निशाणा साधला.

यापूर्वी संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर, असे म्हटले होते. आता यावर स्पष्टिकरण देताना ते म्हणाले की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये नेहमीच ऐकतो. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो.

केंद्र सरकारकडून कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्याच्या निर्णयावरून राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले. मुंबई पोलिसांमुळेच बॉलीवुडमधील अंडरवर्ल्डचा खात्मा झाल्याचेहीत्यांनी यावेळी नमूद केले. मुंबईतील फिल्म इंडस्ट्री १०० वर्ष जुनी आहे. मात्र, येथे असुरक्षित वाटते, असे आजवर कुणीही म्हटलेले नाही. एका मुलीच्या बोलण्यावरून मुंबई पोलीस वाईट होत नाहीत. मुंबई पोलिसांनीच मुंबईला अंडरवर्ल्डच्या कचाट्यातून मुक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER