अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवणे हा तुमचा प्लॅन होता का; संजय राऊत म्हणाले..

Ajit Pawar - Sanjay Raut

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ (Shut up Ya kunal) या कार्यक्रमासाठी संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यावेळी कुणाल कामराने संजय राऊत यांना गेल्यावर्षी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्याबद्दल भाष्य केले .

अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का, अशी विचारणा कुणाल कामरा याने केली. ही शक्यता संजय राऊत यांनी पूर्णपणे नाकारली नाही. या प्रश्नावर राऊत यांनी सूचक मौन बाळगले. अजित पवार यांना आम्हीच पाठवले, हे मीच कसे बोलू शकतो. सत्य आम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय अंदाज बांधायचेत ते बांधा, अशी मोघम टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

यावर कुणाल कामरा याने मग तुम्ही अजित पवार यांना पुन्हा एकदा अशाच शपथविधीसाठी राजभवनात पाठवणार का, असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, आता राजभवनातील अलार्म आणि घड्याळ बदलण्यात आले आहे. त्या प्रकारानंतर राजभवनात पहाटेचा अलार्म लावणे बंद झाले, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER