गांजा मारून लसीकरणाची घोषणा केली होती का? गोपीचंद पडळकर संतापले

Jayant Patil - Gopichand Padalkar

मुंबई :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, कोरोनाला (Corona) रोखण्यासाठी ‘ठाकरे सरकार’ने १८ वर्षांपुढील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू होणारे लसीकरण (Vaccination) लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे लसीच्या तुटवड्यावरून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकारचा (Thackeray Government) समाचार घेतला आहे.

या सरकारकडे कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. केंद्राकडून राज्य सरकाराला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र तरीही राज्य सरकार आपली जबाबदारी केंद्राकडे ढकलत आहे. जर केंद्राने लसींचा पुरवठा केलाच नव्हता तर कडक गांजा मारून पत्रकार परिषदेत लसीकरणाची घोषणा केली होती का? असा संतप्त सवाल त्यांनी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना केला. लस कधी देणार, कुठे देणार, कोणाला देणार याबाबत सरकारने कुठलीही माहिती दिलेली नाही. हे सरकार सपशेल अपयशी ठरत आहे, अशी टीका करत त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button