अजिंक्य नेपोलियनच्या पराभवाचं कारणं एक ज्वालामुखी होता का?

Maharashtra Today

जागतिक इतिहासात नेपोलियन बोनापार्टचा (Napoleon Bonaparte)उल्लेख केल्याशिवाय या विषयाला पुर्ण विरामच देता येत नाही. ‘अशक्य हा शक्य माझ्या शब्दकोषात नाही’ हे वाक्य त्यानं फक्त बोलून नाही तर जगून दाखवलं होतं. त्याच्या आयुष्यभराच्या संघर्षात त्यानं अनेक गोष्टी पाहिल्या. अनेक विरोधी गोष्टींशी त्यानं झुंज घेतली आणि प्रतिकुल परिस्थीतीत त्यानं विजय मिळवला. त्यानं अनेक मैदान गाजवली. कित्येक युद्ध जिंकली पण ‘वॉटरलू’ची (Waterloo) लढाई विशेष प्रसिद्ध आहे.

अजिंक मानल्या जाणाऱ्या या सेनानायकाला वाटरलूच्या लढाईत पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या पराभवाच्या कारणांचा जगभरातील इतिहासकार आजही अभ्यास करतायेत. आणि संशोधनाअंती हे समोर माऊंट तमबोराचा ज्वालामुखी (Volcano of Mount Tambora) त्याच्या पराभवाचं कारण असल्याचं अनेक इतिहासकार मानतात.

युद्धाच्या आधीच झाला ज्वालामुखीचा स्फोट

सन १८१५ला बेल्जियमच्या वॉटरलूच्या धरतीवर निपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटीन सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलं. तुंबळ युद्ध झालं आणि अजिंक्य असणाचं मानचिन्ह नोपोलियननं या युद्धात गमावलं त्याचा मोठा पराभव झाला. अनेक वर्ष हे युद्ध जिंकण्याचं आणि नेपोलियनला पराभूत करण्याच श्रेय इंग्रजी अधिकाऱ्यांना देण्यात आलं. पण गेल्या काही वर्षांपुर्वीपासून सुरु असलेल्या संशोधनानं एक वेगळीच बाजू प्रकाशात आणलीये. नेपोलियनच्या पराभवाचं कारण फक्त इंग्रज सैन्याचं शौर्य नव्हतं तर निसर्गाची अवकृपा हे देखली त्याच्या पराभवाचं कारण होतं.

नेपोलिनच्या पराभवाचा शोध घ्यायला सुरुवात केली की अनेक कारणं समोर येतात. या युद्धाच्या २ महिन्यांआधी १३ हजार किलोमीटर दुरवर असणाऱ्या माउंट तमबोरामध्ये ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. यात तब्बल १ लाख लोकांनी जीव गमावला. इतिहासातल्या सर्वात भयानक घटनांपैकी एक घटना म्हणून याची नोंद झाली. या उद्रेकामुळं वातावरणात मोठे बदल झाले होते.

विस्फोटामुळं बदललं युद्धाचं चित्र

ज्वालामुखीच्या विद्रोहामुळं युरोपच्या पुर्व भागात मोठ्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं या भागात पुर आला. सातत्याच्या पावसामुळं तिथं मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. नेपोलियनच्या योजनेनुसार त्यानं अंदाज लावला होता की आता तिथं चिखल राहिला नसेल. पण त्याचा हा अंदाज चुकीचा ठरला.

ज्यावालामुखीच्या विस्फोटानंतर धुळीचे कण आणि वातावरणात परसले. हे कण दिसायला फार छोटे होते पण त्यांनी आसमंत व्यापला होता. ज्वालामुखीचा उद्रेक इतका भीषण होता की हे कण आकाशात खुप उंचवर फेकले गेले. त्यांनी अवकाशात एक नैसर्गिक छत्र निर्माण केलं. पुन्हा तिथं ढग जमले ज्यामुळं सुर्याचा प्रकाश पुर्ण ताकदीनं तिथल्या जमिनीवर पडलाच नाही.

हे संशोधन केलंय इम्पेरिअल कॉलेज ऑफ लंडनचे जेष्ठ प्राध्यापक मॅथ्यू गेज यांनी. त्यांचं हे संशोधन त्यांनी ऑनलाईन प्रकाशितही केलंय. गेज यांच्या म्हणण्यानूसार या धुळीकणांनी सुर्यप्रकाश झाकोळला. त्यामुळं चिखलाच रुपांतर दलदलीत झालं. नेपोलियननं दुरुन या प्रांतात शिरकाव केला आणि लढ्यास उभारला पण या दलदलीचा अंदाज नसल्यामुळं नेपोलियनच्या महान सैन्याला गुडघे टेकावे लागले.

वातावरणाकडं दुर्लक्ष करणं पडलं महागात

नियोजनाच्या बाबतीत नेपोलियनला नेहमी महान मानलं गेलं. युद्धाच्या वेळी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करुन तो त्यावर तोडगा काढत असे. माउंट तमबोचा ज्वालामुखी विस्फोट ५ एप्रिल १८१५ ला झाला. या विस्फोटामुळं उडालेल्या धुळीनं जमिन, इमारती आणि संपूर्ण मैदान झाकून टाकलं. विस्फोटात एक लाखाहून जास्त लोकांना जीव गमवावा लागला. मोठ्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी हा आकडा मांडलाय.

नेपोलियननं १८ जून १८१५ ला ७२ हजार सैनिकांना घेवून बेल्जियमच्या दिशेनं कुच केली वातावरणाच्या प्रभावाकडं त्यांन पुर्णपणे डोळेझाक केली होती. इंग्रजांच्या ६८ हजार सैन्याच्या तुलनेत आपले सैन्यबळ जास्त आहे, हे युद्ध आरामात जिंकता येईल असा त्याचा समज होता. पण युद्धमैदानात झालेल्या दलदलित त्याच्या विजयाची शक्यता रुतुन बसली.

या युद्धाचे भीषण परिणाम नेपोलियनला भोगावे लागले. २२ हजार सैन्य धारातिर्थी पडलं तर ३३ हजार सैनिकांना गंभीर जखमा झाल्या. नेपोलिनसाठी हा अपमानजन पराभव होता. यामुळं युद्धात त्याला गुडघे टेकावे लागल्यामुळं त्यानं कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळाली.

नाहीतर युद्धाचे परिणाम काही वेगळेच असते

या विषयावर २००५ ला ‘रॉयल मॅट्रोलॉजिकल सोसयटी’न संशोधन करुन सांगितलं की, दोन्ही सैन्यावर वातावरणाचा बदलाचा प्रभाव पडला. नेपोलियनच्या पराभवाला बदललेलं वातावरण आणि चुकीचं युद्धनिती ही देखील कारणं आहेत. या युद्धाच्या पराभवामुळं युरोपाचा आणि पर्यायानं जगाचा इतिहास बदलला. हे युद्ध नेपोलियननं जिंकलं असतं तर इंग्रजांहून जास्त ताकद त्यानं कमावली असती. इंग्रजांची मोठी पिछेहाट झाली असती. संपूर्ण युरोप नेपोलियनच्या ताब्यात असता. इंग्रजांनी न जहाजं बांधली असती न जगावर राज्य केलं असतं.

नेपोलियनं जर या युद्धात जिंकला असता तर आजचा युरोप पुर्णपणे वेगळा असता आणि जगाचा इतिहाससुद्धा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER